सिमला येथील ब्रिटिशकालीन पंपिंग सेंटर व फिल्टर प्लांट पाहण्यासाठी आज बेळगावच्या नगरसेवक आणि नगरसेवकांच्या अभ्यास पथकाला जवळ जवळ १४ किमी ची पायपीट करावी लागली.
मात्र जे काही बघायला मिळाले ते अतिशय उत्कृष्ट होते, असे या पथकाने बेळगाव live ला सांगितले आहे.
सीमल्याला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा आणि संपूर्ण
पाईप लाईन ब्रिटिशकालीन आहे. विशेष म्हणजे अजून एकदाही दुरुस्ती करावी लागली नाही. बेळगाव मध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतोय. असे या पथकाने सांगितले आहे.
एकही लिकेज नाही आणि हा प्रकल्प संपूर्ण सिमला शहराला पाणी पुरवठा करतो हे सुद्धा सांगण्यात आले. सिमला मनपाच्या अधिकाऱ्यांनी
ही सिस्टीम आज दाखवले. बेळगावचे नगरसेवक आज
सकाळी १० वाजता गेले होते.
सायंकाळी पाच ला जेवण झाले.
सात किमी जाऊन परत सात किमी बाहेर येण्यासाठी चालत जावे लागले. दिवसभर फिरून परत येण्यासाठी संध्याकाळचे साडेसात वाजले होते. या सात की मी पायपीट करून माहिती घेतल्याने महिला नगरसेवकांना काहीसा त्रास सहन करावा लागला.
या भागात मिळणाऱ्या औषधी वनस्पतीची माहितीसुद्धा नगरसेवकांनी घेतली.