बेळगाव मनपातील नगरसेवकांचा अभ्यास दौरा सिमला येथे सुरू आहे. या दौर्याबद्दल उलट सुलट चर्चा झाल्या.
दौऱ्यात झालेली भांडणे आणि एक नगरसेवक परत येण्याच्या घटनेचीही जोरात चर्चा आहे. किमान दौऱ्याला गेल्यावर तरी नगरसेवक वर्गाने तारतम्य राखायला पाहिजे असे मत या दौऱ्याला न गेलेल्यापैकी एक नगरसेवकाने बेळगाव live कडे मांडले.
आपण वैयक्तिक, कुटुंबासोबत किंव्हा मित्रांबरोबर सहलीला गेलो तर गोष्ट वेगळी असते. आपण जर जबाबदार नगरसेवक म्हणून एक अभ्यास दौऱ्यासाठी जात असलो तर आपली व्यसने बाजूला ठेऊन वागायला पाहिजे पण काहीजण हे पथ्य पाळत नाहीत हे बघून दुःख वाटले असे त्या नगरसेवकाने म्हटले.
एक दोघे चुकीचे वागतात आणि सगळ्यांचे नाव बदनाम होते. तेंव्हा यापुढे तरी काळजी घ्या. नवीन गोष्टी शिकून या आणि त्या गोष्टींचा बेळगाव शहरासाठी उपयोग करा….. अशी विनंती त्या नगरसेवकाने केली आहे.