दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या पोलिसांच्या दीक्षांत कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या कर्मचाऱ्यास विजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात घडली आहे.
मंजुनाथ श्रीशैल लक्कुंडी वय 25 रा.हिरेबागेवाडी असे मयताचे नाव असून तो गेले वर्षभरा पासून प्रशिक्षण केंद्रात नोकरीवर होता.
आगामी सोमवारी खानापूर पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये दीक्षांत समारंभ होणार आहे त्या निमित्ताने सजावटीचे काम सुरू आहे मुख्य प्रवेश द्वारा वर झेंडे लावत असताना झेंड्याची लोखंडी सळी मुख्य विद्युत वहिनीला स्पर्श झाल्याने विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने तो अत्यवस्थ झाला होता लागलीच त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलें मात्र उपचाराचा काहीही उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला आहे.
मयत मंजुनाथ याच्या पश्चात आई वडील लहान बहीण असा परिवार असून घटनेची माहिती कळताच मंजुनाथ यांचे कुटुंबीय इस्पितळात दाखल झाले त्यांनी एकच आक्रोश केला होता.खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.