बेळगाव दौरा होऊन दोन दिवस उलटले तरी यावर जारकीहोळी बंधूनी एक चकार शब्दही उच्चारला नाही.एकूणच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या जल संपदा मंत्री डी के शिवकुमार यांनी बेळगाव दौऱ्या नंतर कळसा भांडुरा चे निमित्य पुढे जारकीहोळी बंधुचं तोंडचं बंद केलंय.
कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री डी के शिवकुमार यांचा बेळगावचा धावता दौरा हा केवळ सरकारी नसून त्यामागे राजकीय गुपित दडले आहे.प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर व जारकीहोळी बंधू यांच्यातील मतभेद वरिष्ठ पातळीवर पोचले असताना या दौऱ्याला एक विशेष राजकीय महत्व प्राप्त झाल्याचे दिसते.
(File photo:ramesh jarkiholi and dk shiv kumar)
डी के शिवकुमार यांचा बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात हस्तक्षेप वाढलाय त्यामुळं व्यथित झालेल्या जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी शिवकुमार यांच्या विरुद्ध पक्ष वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. त्यामुळं कर्नाटकातील मैत्री सरकार अडचणीत आले असताना ते वाचवण्यासाठी उभय बाजूने जोरदार प्रयत्न सुरु आहेत अश्या वेळी कळसा भांडुरा पहाणीचे निमित्त पुढे करून शिवकुमार यांनी बेळगावचा जो धावता दौरा करून एक प्रकारे जारकीहोळी बंधूंना आवाहनच दिले आहे.
बेळगाव दौऱ्याच्या वेळी कळसा भांडुरा प्रकरणी निधी मंजूर नसताना देखील अधिकाऱ्यानी केवळ नकाशे हातात घेऊन विकास कामे हाती घेतल्याचा देखावा उभा करून शिवकुमार यांनी जारकीहोळी बंधूंना अप्रत्यक्षरित्या इशाराच दिला आहे मी विकास कामे करण्यासाठी बेळगावला येऊ शकतो या कृतीला कुणीही अडवू शकत नाही असं देखील दाखवून दिलंय.या दौऱ्याच्या वेळी एकीकडे शिवकुमार समर्थक आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व सतीश जारकीहोळी यांचं नेतृत्व मानणाऱ्या आमदार अंजलीताई निंबाळकर या ही उपस्थित होत्या.
विशेष म्हणजे या दौऱ्या वेळी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची उपस्थिती आवश्यक होती मात्र ते तेथे फिरकलेही नाहीत.
-जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे