कोणत्याही मोठ्या अनोळखी व्यक्तीचा फोटो किंवा व्हीडिओ काढणे कधीही अंगलट येऊ शकते बेळगाव शहरात देखील असाच प्रकार समोर आला आहे.पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांचा फोटो काढणे एकट्या युवकाला अंगलट आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे.
पोलीस आयुक्त डी सी राजप्पा हे वाहनातून आपल्या कार्यालयाकडे जात असतेवेळी सदर युवक आपल्या मोबाईल वरून फोटो शूटिंग काढत होता पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने पलायन केले मात्र त्याला मुख्य पोलिसांनी हेड क्वाटर्स जवळील प्रार्थना स्थळा जवळ पकडून ताब्यात घेतले आणि चौकशी केली.
मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी हे त्यावेळी कार्यालयात होते त्यांनी सदर युवकाची चौकशी केली व्हीडिओ का काढलास असे विचारले असता मला आयुक्ता बद्दल अभिमान आहे म्हणून काढलो अशी माहिती दिली यावेळी सदर युवकाची सखोल चौकशी करून त्यास सोडून दिले.
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे म्हणून अनोळखी व्ही आय पी व्यक्तींचे फोटो व्हीडिओ काढणे अंगलट येऊ शकते हे या घटनेवरून सिद्ध होते.