.कुसुम सद्राते, महापौर,राकेश कुमार शर्मा उपमहापौर सिमला आणि सिमल्याच्या मनपाला भेट देऊन आमचे बेळगावचे नगरसेवक खरोखरच अभ्यास करत आहेत. हे नगरसेवक गेले यावर बरीच उलट सुलट चर्चा झाली पण आता ते जो अभ्यास करत आहेत त्याचा लाभ बेळगाव शहराला होणार काय? हा प्रश्न आहे.
सिमला ची संस्कृतीची जपणूक तेथील मनपाने केली आहे. तेथे पहाडी संस्कृती आहे. उंच सखल आणि टेकडीमय जागेत घरे आहेत पण ड्रेनेज ची व्यवस्था चांगली आहे. नुकतीच सिमला च्या मनपा पथकाने बेळगावला भेट दिली होती बेळगाव प्रमाणे सिमला शहराला २४ तास पाणी देण्याचा उद्देश आहे.
या शहराचं स्मार्ट सिटी मध्ये नाव गेलं आहे, दुसऱ्या यादीत हा समावेश होईल तेंव्हा विकास चांगला होईल अशी बेळगावच्या नगरसेवकांची निरीक्षणे आहेत.तेथील बांधकाम पद्धत, सेट बॅक मध्ये पायऱ्या या गोष्टींची पाहणी झाली असून उद्या पुन्हा पाहणी दौरा होईल.१५ लाख रुपये खर्च करून हा पाहणी दौरा होत आहे.
आमदार फॉरेनला जातात आम्ही का जाऊ नये? असा प्रश्न विचारून गेलेले नगरसेवक सिमला मधील१९०८ मधील ब्रिटिशकालीन मॉल नूतनीकरण कैदी लोकांनी केलेल्या कामाची माहिती घेत आहेत.पहिल्या दिवशी नगरसेवकांनी सिमला पालिकेस भेट दिली या नंतर सिमला टॉऊन हॉल,बचत भवन
भेट देऊन माहिती जाणून घेतली उद्या शुक्रवारी देखील त्यांचा अभ्यास दौरा सुरूच राहणार असून, त्यांच्या या अभ्यास दौऱ्याला बेळगाव live च्या शुभेच्छा.