मारिहाळ गावात एकाने दुसऱ्याला लोखंडी रॉड ने मारहाण केली आहे. आसिफ मुल्ला (वय ३७) रा मारिहाळ हा जखमी झाला आहे.
तौसिफ फनिबंद( वय ३६ )रा मारिहाळ याने ही मारहाण केली असून त्याच्यावर मारिहाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
ही मारहाण वैयक्तिक कारणातून झाली असल्याचे सांगितले जात असले तरी ती राजकीय कारणातून झाल्याचा अंदाज आहे.
जारकीहोळी ब्रदर्स आणि आक्का यांच्या वादात ही मारहाण झाल्याचे ऐकायला मिळत असून नेत्यांच्या भांडणात काँग्रेस कार्यकर्ते आपली डोकी फोडून घेत असल्याचा हा प्रकार असल्याची चर्चा आहे.