सीमावर्ती भाग असो वा मिरज आदी ठिकाणी आता गर्भपात प्रकरणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी आता प्रत्येक खाजगी आणि इतर बेकायदा दवाखान्यावर नजर असणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष ठेऊन यासाठी मोहीम राबविणे गरजेचे बनत आहे. मात्र आरोग्य विभाग सध्या सुस्त झाल्याचेच दिसून येत आहे.
सांगली जिह्यात असे अनेक गुन्हे घडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेथील आरोग्य विभागाने ६०० हुन अधिक दवाखान्याची तपासणी मोहीम राबविली. बेळगावात सध्या ही संख्या कमी असली तरी याबाबत जागृतीसाठी पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आरोग्य विभागाने एक पथक नेमून कारवाई करण्यास सुरुवात केली पाहिजे.
या प्रकरणी महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. जर कोठेही अवैध प्रकारे गर्भपात होत असतील तर ते रोखण्यासाठी मनपाने त्याची चौकशी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून आपली जबाबदारी संपली अशीच भूमिका दिसून त्यात आहे.
जर ही मोहीम राबवायची असल्यास सुमारे १० पथके नेमून एकाचवेळी धाड घालण्यात यावी व गाव भागात यासाठी जागृती करावी, असे सांगण्यात येत आहे. मात्र असे कोणतेच प्रयत्न करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. याचा गंभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.