एकीकडे शिवाजी नगर भागात झालेल्या दगडफेकीच्या प्रकारा नंतर या भागात तणाव निर्माण झाला असताना जालगार गल्ली गणेश मंडळात मात्र सौहार्दपूर्ण वातावरणात मिरवणुकीस सुरुवात झाली आहे.
जालगार गल्लीतील सार्वजनिक गणपतीचे मुस्लिम बांधवांनी स्वागत करत मिरवणुकीची सुरुवात केली आहे.रविवारी रात्री अकरा वाजता जालगार गल्लीतील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे.नगरसेवक मतीन शेख आणि इतरांनी यांनी नारळ वाढवून मिरवणुकीची सुरुवात केली आणि धार्मिक सौहार्द तेच उदाहरण समोर आणलं आहे.
जालगार गल्लीत सध्या मिरवणूक असून गल्लीत गणपती फिरताना मुस्लिम धर्मीय देखील सहभागी झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी दिली.गणपती मिरवणुकीचे स्वागत करतेवेळी गल्लीतील मुस्लिम समाजाचे पंच इब्राहिम सौदागर,सलाम शेख अली,कैफ बागलकोटी आदी यावेळी उपस्थित होते.
शहरात जालगार गल्ली हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो मात्र या मंडळाने सर्व धर्मन समभाव जपून शहरा समोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय अशी चर्चा इथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यात होत होती.