रविवारी बेळगावात होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचं लक्ष लागले असताना शहरात होत असलेल्या अनुचित प्रकाराने विसर्जन मिरवणुकीतील पोलीस अधिकाऱ्यां वरील बंदोबस्ताचा ताण वाढवला आहे.हा ताण कमी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जुन्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून त्यांची मदत मिळणार आहे.
यापूर्वी बेळगावचे पोलीस उपायुक्त पदी काम पाहिलेले अधिकारी अमरनाथ रेड्डी आणि तसेच बेळगावमध्ये पोलीस निरीक्षक पदी काम केलेले एस एम नागराज यांच्याकडे बेळगाव गणेश विसर्जन बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा अनुभव बघून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
अमरनाथ रेड्डी हे सध्या एसीबी चे पोलीस प्रमुख आहेत तर नागराज हे डीएसपी दर्जाचे अधिकारी असून ते सध्या जिल्हा पोलिस दलात महत्वाच्या जबाबदारीवर आहेत. त्यांचा अनुभव पाहून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना खडे बाजार ए सी पी पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.
अमरनाथ रेड्डी यांनी बेळगावचे पोलीस उपायुक्त पदी काम करताना गेली सलग दोन वर्षे गणेश विसर्जन आणि इतर बंदोबस्त जवळून पाहिले आहेत ते शांततेत पार पाडण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती या बंदोबस्त आणि व
विसर्जन मिरवणुकीचा त्यांना अनुभव आहे. तर दुसरे अधिकारी नागराज हे कॅम्प आणि मार्केट यांनी दोन महत्वाच्या पोलीस स्थानकांवर निरीक्षक म्हणून प्रभावीपणे काम केलेले आहेत याची नोंद घेऊन त्यांना नेमण्यात आले आहे. नागराज यांनी अलीकडेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या बेळगाव दौऱ्यावेळी महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती ती त्यांनी यशस्वी रित्या पार पाडली होती. त्यामुळेच या दोन्ही अधिकाऱ्यावर बंदोबस्तासाठीची सूत्रे हलवणार आहेत.
सणाच्या उत्साहात विरजण घालण्यात काही राजकीय आणि धार्मिक शक्ती कार्य करत असल्याची अधिकृत माहीत पोलीस दलाच्या हातात आली आहे. शांत परिसरात गोंधळ माजवण्याचा कट असल्याचे लक्षात आले आहे म्हणून पोलीस आयुक्त डी सी राजप्पा याना बळ देण्यासाठी ही जुनी जोडगोळी काम करणार आहे.