शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भेंडीबाजार येथील गणेश मंडपावर दगडफेक झाली पण त्यानंतर काही काळात आझाद गल्ली येथील एक प्रार्थनास्थळ व रस्त्याच्या शेजारी थांबलेल्या काही रिक्षांवरही दगडफेक करण्यात आली आहे.
दोन्ही समाजाच्या धार्मिक भावना दुखावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यामागे समाजकंटकांचा असल्याचा संशय आहे.
खडेबाजार पोलीस स्थानक हद्दीतील काही ताबूत विसर्जनासाठी घेऊन जात असताना ते मार्केट पोलीस स्थानक हद्दीत पोचलेच कसे हा संशोधनाचा विषय ठरत आहे. जाणीवपूर्वक काही कृत्ये करून गणेश विसर्जन मिरवणुकीवर डोळा ठेऊन संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत आहे याचा शोध पोलीस दल घेत आहे.
मोहरम ची विसर्जन मिरवणूक जात असल्याने झालेल्या या घटनांवर पोलीस दल बारीक लक्ष देऊन आहे, स्थानिक बंदोबस्त पथकांच्या बरोबरच इंडस्ट्रीयल सिक्युरिटी दलालाही नेमण्यात आले असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलीस आयुक्त डी सी राजप्पा आणि उपायुक्त सीमा लाटकर यांच्या नेतृत्वात बंदोबस्त लावण्यात आला असून शहरात जवळपास 172 सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
भेंडी बाजार भागातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला आहे. याच मंडळा समोर शनिवारी रात्री सात वाजता महा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.या मंडळाचं शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकारी बी एस बोमनहळळी यांना भेटून समाज कंटकावर कारवाई बाबत निवेदन देणार आहेत.