असावा सुंदर चॉकलेटचा बंगला… मुलीच्या आग्रहाखातर चॉकलेटचे मंदिर बांधून घेत आगळ्या प्रकारचा गणेश देखावा सविता परील यांनी अनगोळ भाग्यनगर येथील आपल्या घरी साकारला आहे .
त्यामुळे हे चॉकलेट मंदिर आता सर्वांच्याच चर्चेत आले आहे . डेअरिमिल्क , पर्क , फ्यूज , गोल्ड 999 , क्रॅकल . लंडन डेअरी अशा व्हाकलेटच्या नानाविध प्रकारांनी मंदिराच्या प्रतिकृतीची निर्मिती केली आहे .
वसंतराव पोतदार पोलिटेक्निकमध्ये आर्किटिक विभागात सेवारत असलेल्या सविताने हरिमंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या भाग्यनगर पाहिला क्रॉस येथील मनन अपार्टमेंटमध्ये हे मंदिर साकारले आहे . त्यांनी तब्बल आठ हजार रुपयांचे चॉकलेट खर्च केले आहेत.
मंदिराच्या प्रतिकृतीसाठी सुमारे 600 हुन अधिक चॉकलेट वापरण्यात आले असून विविध रंगसंगतीच्या चॉकलेटचा वापर करून मंदिर ही रंगीत आणि आकर्षक केले आहे .
श्रीमती सविता पाटील यांना त्यांच्या मातोश्री सुनंदा व मुलगी वैष्णवी पाटील यांनी मदत केली . लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतात ,मुलीनेही यंदा ही संकल्पना मांडल्याने आपण चॉकलेट मंदिर बनविले आहे सविता म्हणाल्या ..
बेळगाव live शी बोलताना वैष्णवी म्हणाली की मी चॉकलेट वर अनेक गाणी म्हणते असे म्हणत.तिने गणपती चॉकलेट वर सुंदर आवाजात गाणे म्हटले …
कृपया
सविता पाटील ऐवजी सविता जाधव असे चुकून झाले आहे तरी सविता पाटील बरोबर आहे .