मागील २४ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्कंडेय सहकारी साखर कारखाना उभा करण्यात आला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या. मात्र अजूनही कारखाना सुरू झाला नाही. मात्र यावेळी शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघा दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. अशी घोषणा पुन्हा एकदा झाली आहे. कारखान्याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. सध्या या कारखान्याच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका संपताच कारखान्याचा धूर निघेल असे वातावरण तयार झाले आहे.
निवडणूकिसाठी अर्ज भरण्याचा गुरुवारी हा शेवटचा दिवस आहे. बुधुवारी १९ जणांनी अर्ज भरले असून आज ४० जण अर्ज भरणार असंल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही वर्षांपूर्वी पुन्हा या कारखान्याच्या कामाला जोर लावण्यात आला आहे. लवकरच हा कारखाना सुरू होणार अशी माहिती देण्यात आली आहे.
सुरुवातीला ८० हजार शेतकऱ्यांनी सभासद म्हणून आपले शेअर भरले होते. मात्र कालांतराने हा कारखाना सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले . मागील निवडणूकही जोरदार झाली होती मात्र यावेळीही रंगत वाढणार आहे. त्यामुळे कारखान्याचा धूर काढण्यासाठी अनेकांचे प्रयत्न असणार आहेत.
८० हजार सभासदवरून आता ३ हजार सभासद मतदान करणार आहेत. या ३ हजार मतदारांवर १४ सदस्यांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे अनेकजण आतापासून कामाला लागले आहेत. मात्र जर यावेळेस जर कारखान्याचा धूर बाहेर पडला नाही तर धुरळा बाहेर पडण्याची शक्यता मोठी आहे.