कित्येक वर्षे विधायकतेची कास धरून या मंडळाची वाटचाल सुरू आहे. आपल्या सामाजिक कामांच्या जोरावर या मंडळाने विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली असून रक्तदान, अन्नदान, आर्थिक मदत या प्रकारे सामाजिक काम सुरूच ठेवले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा थोर पुरुषांच्या प्रेरणेतून मंडळाचे काम सुरू आहे. गणेशोत्सवाला सुसंस्कृतपणा आणून आपली हिंदू संस्कृती जपण्याची शपथ या मंडळाने घेतली आहे.तसेच असे काम करण्याची प्रेरणा इतर मंडळांना ही देत आले आहेत म्हणून हे गणेश मंडळ बेळगावातील उत्कृष्ट विधायक गणेश मंडळ ठरलं आहे.
दरवर्षी जनसेवेचे उपक्रम राबवले जातात.शांताई वृद्धाश्रमाच्या रद्दीतूनहे गणेश मंडळ बेळगावातील उत्कृष्ट विधायक गणेश मंडळ ठरलं आहे. बुध्दिकडे योजनेस रद्दी संकलित करून दान देणे, बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या माजी महापौर विजय मोरे यांच्या कार्यात साथ देणे असे काम केले आहे. दसऱ्यात कमकारहट्टी येथील गो शाळेला भेट देऊन हिरवा चारा देणे हा उपक्रम राबवून गो सेवाही केली आहे.
मणूर येथील एक निराधार वृद्धेला या मंडळाने आधार दिला. वेळोवेळी शहर स्वच्छ राखण्यासाठी हे मंडळ श्रमदान करत आले आहे. गोगटे सर्कल येथील सिग्नल ला वेली आणि झुडपांनी विळखा घातला होता त्यामुळे सिग्नल दिसत नव्हता तेंव्हा या मंडळाने ही झुडुपे हटवून सिग्नल मोकळा केला होता.
शिष्टबद्ध आणि पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकीत सहभाग हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. लहान मुले मुली आणि महिलांसाठी विविध स्पर्धा भरवणे, आर्थिक अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे, गरजू रुग्णांना औषधे व शस्त्रक्रियांसाठी मदत करणे अशी कामे करून विधायकता जपली जात आहे.
शहर आणि परिसरात कार्यरत सफाई कामगारांचा सत्कार आणि लुप्त होत चाललेली भजनी मंडळांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी भजन कार्यक्रमांचे आयोजन हे मंडळ करते. याच बरोबरीने इतर अनेक सामाजिक उपक्रमात मंडळाने हातभार लावला आहे.