हे मंडळ छत्रपती युवक संघटना टिळकवाडी च्या माध्यमातून मागील १८ वर्ष विधायकता जपत गणेशोत्सव साजरा करीत आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंगावर आधारित मूर्ती आणि प्रचंड सामाजिक उपक्रम हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.
यंदा अगस्त्य ऋषीच्या वर आधारित प्रसंग आणि
कावेरी नदीचा उगम कसा झाला यावर मंडळाची मूर्ती आधारित आहे. दरवर्षी सरस मूर्ती बसवल्यामुळे मंडळाला आणि मूर्तीला दरवर्षी प्रथम क्रमांक मिळत आला आहे.
संपूर्ण डेकोरेशन हे कार्यकर्तेच करतात. स्वतः
मेहनत घेतात, कार्यकर्ते विविध कथांवर आधारित प्रसंग शोधून मुर्ती ठरवतात आणि त्याप्रमाणे बनवून घेतात. सामाजिक कार्यात हे मंडळ सर्वात पुढे आहे.
आर्ष विद्या मंदिर मध्ये शिक्षण घेणाऱ्या ६० मुलांना दरवर्षी तीन महिने पुरेल इतका धान्यसाठा दिला जातो.कित्येक वर्षे मालतीबाई साळुंके गर्ल्स हायस्कुल आणि मराठी मुलांची शाळा क्रमांक ९ नागझरी शाळा यांना दत्तक घेण्यात आले असून पिण्याच्या पाण्याची सोय व इतर मदत केली जाते.
यंदा अध्यक्ष पवन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असून नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते अनंत देशपांडे यांचे मार्गदर्शन मंडळाला लाभत आहे. दरवर्षी महाप्रसाद आयोजन केले जाते.
कित्येक वर्षे रक्तदान शिबिर घेतली पण रक्त परत मिळत नव्हते यासाठी या मंडळाने गरज पडेल तेंव्हा रक्तदान हा उपक्रम राबविला आहे. रक्तदान करणाऱ्यांची साखळी वाढवण्यासाठी दरमहा १० ते १२ जण रक्तदान करतात.साखळी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून महान काम होत असून मंडळाचे सेक्रेटरी सागर भोसले यांनी ५५ वेळा तर कार्यकर्ते विजय शिंदे यांनी ४५ वेळा रक्तदान केले आहे, मार्गदर्शक अनंत देशपांडे यांनी तर आजवर १०० रक्तदान केले असून असे अनेक कार्यकर्ते या मंडळाच्या माध्यमातून घडत आहेत.