बेळगाव शहरातील सर्वात पहिले मंडळ म्हणून ओळखले जाणारे हे मंडळ आजही अनेक विधायक कामामुळे प्रसिद्ध आहे. सलग ११५ वर्षांची कारकीर्द असलेल्या या मंडळाने आपली विधायकता जपली पाहीजे याचा वस्तूपाठ घालून दिला आहे.सध्या अध्यक्षपदी गिरीश पाटणकर असून त्यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ चालते.हे मंडळ बेळगावातील उत्कृष्ट विधायक गणेश मंडळ ठरलं आहे.
शरीरसौष्ठव या विषयावर या मंडळाचा नेहमीच भर आहे. यावर्षीही ज्येष्ठ उद्योजक रावसाहेब गोगटे यांच्या स्मरणार्थ करेला स्पर्धा झाली, अनेक तरुणांना या कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. याच बरोबर जिल्हास्थरिय १४ वी शरीर सौष्ठव स्पर्धा हे या मंडळाचे प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण आहे.
भाविकांची काळजी करणारे हे मंडळ आहे. दरवर्षी गणपती पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना गणेश मंडपात चहा बिस्किटचे वाटप हे मंडळ करते. शिवाय भाविकांच्या सोयीसाठी उत्सवातील शेवटचे चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करतात. गाणे, नृत्य, नाट्य असे कार्यक्रम मंडपासमोर घेतले जातात.
कुणाकडूनही देणगी मागायची नाही या उद्देशाने २००५ पासून हे मंडळ काम करत आहे. फक्त जमलेल्या निधीचे व्याज आणि दरवर्षी विविध कार्यक्रमास प्रायोजक निवड या जोरावर मंडळाचे काम चालत आले आहे.वर्गणी घेतली जात नाही आणि पैसे द्या अशी जबरदस्ती हे मंडळ कुणावरही करत नाही.
क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम ना चालना देठे मंडळ काम करताना काही नियम मंडळाचे कार्यकर्तेही पालताळे आहेत. उत्सवाच्या ११ दिवस काळात मद्य मांस सेवनावर स्वताच बंदी घालून घेऊन पवित्र राहण्याचा प्रयत्न केला जातो. उत्सवात नाहीच तसेच अनंत चतुर्दशीलाही असे प्रकार घडू नव्हेत म्हणून काळजी घेण्यात येते.
गेली अनेक वर्षे हे मंडळ मिरवणूक मार्गात न जाता
स्वतंत्र जाऊन रात्री ९ ला आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करते. फटाकडे वाजवले जात नाहीत. वेळेत विसर्जन करणे हा मंडळाचा उद्देश आहे. पूर्वी या मंडळाला सर्व व्यापारी पोती भरून फटाके देत होते आणि ते वाजवतही होते पण विसर्जन मार्गावर हॉस्पिटल फार आहेत. याचा विचार करून फटाके बंद करण्यात आले आहेत तसेच डॉल्बी ला सुद्धा विराम देऊन कित्येक वर्षे ढोल ताशा वापरून मिरवणूक काढण्यात येते.
फक्त बोलून नव्हे तर आपल्या वागण्यातून हे मंडळ विधायक कामे करत आले असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.