सध्या गणेशोत्सवात प्रत्येक पोलीस स्थानकात गणपती पूजन व सत्यनारायण पूजन सुरू आहे. आज शहापूर पोलीस स्थानकात गणपती समोर सत्यनारायण पूजा झाली आणि विशेष म्हणजे या पोलीस स्थानकाचे सिपीआय जावेद मुशापुरी यांनी या पूजेला बसून पूर्ण पूजेचे विधी पार पाडले.
पोलीस अधिकाऱ्याला कुठलीच जात आणि धर्म नसतो हेच जावेदभाईंनी वारंवार आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मागील वर्षी पासून पोलीस स्थानकात ते स्वतः गणपती आणतात. आणि विधिवत पूजाही करतात.
आज त्यानी पारंपारिक हिंदू पेहराव केला होता. अंगावर शर्ट आणि पांढरी लुंगी असे ते वावरत होते. पूजेनंतर आयोजित केलेल्या महाप्रसादलाही ते याच पोशाखात होते. स्वतः पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा आणि उपायुक्त सीमा लाटकर यांनी त्यांचे कौतुक केले.
पोलीस अधिकारी असावा तर असा असे मत नागरिकांनीही मांडले. जावेद मुशापुरी यांचे काम महान आहे. स्वतः मुस्लिम धर्मीय असूनही भेदभाव न करता त्यांनी समतेचा संदेश दिला असून याची चर्चा आहे.
एपीएमसी चे सिपीआय जे एम कालीमिरची यांनीही माहीत आठवड्यात पूजन व महाप्रसाद वितरण केले आहे.