महत्वाची आणि उत्त्पन्न देणारी बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती कडे पाहिले जाते. मात्र याठिकाणी पाण्याची समस्या कायम आहे. तसे पाहत येथे दररोज पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. मात्र याकडे एपीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तेंव्हा सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
या बाजारपेठ मध्ये गोवा, महाराष्ट्र तसेच दिल्ली, पंजाब आणि इतर राज्यातील व्यापारी येत असतात. मात्र वारंवार होणाऱ्या पाण्याच्या समस्येमुळे त्यांना नाहक त्रास होऊ लागला आहे. याचा विचार कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या ठिकाणी सुमारे ५ ते ६ दिवसानी पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी पुरवठा का सुरळीत करण्यात आला नाही, याबाबत विचारले असता उलटसुलट उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मागील तीन ते चार दिवसापूर्वी अशाच प्रकारे पाणी पुरवठा करण्यात आला नसल्याने अनेकांना बाहेरून पाणी आणावे लागत होते. मात्र ही समस्या एका वेळेची नसून ती कायमचीच आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासन पाण्याविना कोणाचा तरी जीव गेल्यानंतर लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.