बेळगाव live च्या वतीनं आयोजित सेल्फी विथ बाप्पा आणि विधायक गणेश मंडळ स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पहिल्याच वर्षी आयोजन केलेल्या सेल्फी विथ बाप्पा यात एक हजार हुन अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. तीन वर्षांच्या चिमुरड्या पासून सीनियर सीटीझन,महिला,वकील,डॉक्टर, विद्यार्थी गृहिणी युवक युवतींनी यात सहभाग नोंदवला आहे.सामाजिक कार्यात अग्रेसर शहरातील गणेश मंडळांचा देखील गौरव आम्ही करणार आहोत.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इंफंट्रीचे ब्रेगेडियर गोविंद कलवड,बेळगाव एअरपोर्टचे प्रमुख अधिकारी राजेशकुमार मौर्य,सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर,मध्यवर्ती गणेश महामंडळ पी आर ओ विकास कलघटगी,नरगुंदकर भावे चौक गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर हे उपस्थित राहणार आहेत.
एशियन गेम्स मध्ये ब्रॉंझ मेडल मिळवलेली बेळगावची कन्या मसप्रभा जाधव हिचा सत्कार देखील आम्ही यावेळी करणार आहोत.
बुधवारी सायंकाळी ठीक सहा वाजता शहरातील नरगुंदकर भावे चौक गणेश मंडळाच्या मंडपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश भक्तांनी बेळगाव live च्या वाचकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आवाहन करत आहोत.