रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा आणि या रस्त्यावरून प्रवास केल्यास तेथून पुन्हा येणे नाही अशी गत कंग्राळी ते एपीएमसी रस्त्याची झाली आहे.अक्षरशः मरण यातनाच अनुभवाव्यास मिळतात. त्यामुळे हा रस्ता कधी डांबरीकरण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कंग्राळी ते एपीएमसी सुमारे दोन ते अडीच कीमी चा रस्ता म्हणजे धुळीने माखला गेला आहे. या रस्त्यावरून पावसाळ्यात मोठे खड्डे आणि उन्हाळ्यात धूळ यामुळे तेथुन प्रवास करणारे प्रवासी हा रस्ता कधी होणार? असा सवाल उपस्थित करत आहेत.
या रस्त्यासाठी ५ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. मात्र प्रत्येक्षात या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. पावसाचे कारण सांगून वेळ मारून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे प्रवासी अक्षरशः सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावे शिमगा करत आहे.
या रस्त्यावरून प्रवास करा आणि बक्षीस मिळावा, असे अनेक जण स्पर्धा करत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी खडी टाकण्यात आली होती. आता त्याच खडी चा मनस्ताप प्रवाशांना भोगावा लागत आहे. याचा गंभीर्याने विचार करून रस्ते कामाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.