गणपती बाप्पाच्या गळ्यातील आणि इतर चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना बेळगावातील वडगांव भागातील एका गणेश मंडपात घडली आहे.
मंगळवारी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास सोनार गल्ली येथील मंडपात कार्यकर्ते गाड झोपी गेलेले असताना अज्ञातांनी मंडपात प्रवेश केला आणि 25 हजार किंमतीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे.
सकाळी कार्यकर्त्यांना जाग येताच सदर घटना उघडकीस आली.मंडपात बसवलेल्या सी सी टी व्ही चोरटे दिसत असल्याने लवकरच चोरट्याना गजाआड करू असा विश्वास पोलिस व्यक्त करत आहेत.शहरातील प्रत्येक मंडपात सुरक्षेसाठी होम गार्ड तैनात करण्यात आला असला तरी चोरी झाली आहे.
इतके दिवस बेळगाव शहर परिसरातील अनेक मंदिरातून चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते आता तर चक्क गणेश मंडपातील दागिने लांबवले आहेत.एकूणच पोलिसांनी शहरात गस्त वाढवणे गरजेचे आहे गणेश मंडपात केवळ होम गार्ड तैनात करून चालणार नाही तर इथून पुढेअश्या घटना टाळण्यासाठी 24 तास पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे.