बेळगाव जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सरकारला एक मागून एक हादरे देण्यास सुरुवात केल्यानंतर आता त्यांचेच बंधू असलेले माजी मंत्री आणि एआयसीसी चे सदस्य सतीश जारकीहोळी यांना दिल्ली येथे बोलावण्यात आले आहे.
केपीसीसी चे सर्व महत्वाचे सदस्य आणि सतीश जारकीहोळी यांच्यात चर्चा होणार आहे. रमेश यांनी हादरे देण्यास सुरू केले असताना सतीश मात्र शांत आहेत तेंव्हा तुमच्या भावाला थांबवा अशी मागणी केली जाणार आहे.
दिल्ली येथील त्या बैठकीवर कर्नाटक सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.
सतीश जारकीहोळी आणि रमेश जारकीहोळी काय मागणी करतात आणि ती मागणी सरकार पूर्ण करू शकते का हे आज स्पष्ट होणार असून त्यावर सरकारचे अस्तित्वही ठरू शकेल.