राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पाठीमागे रुबाबदार युनिफॉर्म मध्ये थांबणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तो बेळगावचा सुपुत्र आहे. एड डी कॅम्प म्हणजे एडिसी म्हणून ते काम करतात.
कॉनरॅड डिसोझा असे त्याचे नाव आहे. कर्नल मेलविले डिसोझा आणि अँसिला डिसोझा यांचा तो मुलगा आहे.
बेळगाव मध्ये के एल एस संस्थेचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मागे कॉनरॅड हे होते. राष्ट्रपतींचे असे पाच एडिसी असतात. तीन भु दलातून तर इतर दोन नौदल व हवाई दलातून ते निवडले जातात. तसेच थळ बटालियन मधूनही एक विशेष एडिसी निवडला जातो. राष्ट्रपतींना आपल्या निर्णयाप्रमाणे कुठल्याही लष्करी संस्थेतला अधिकारी एडिसी म्हणून निवडण्याचे अधिकार आहेत.
मेजर जनरल किंवा तसे रँक असलेल्या पदावरील अधिकाऱ्यास भारतात या पदावर नेमले जाते.असा हा मान बेळगावच्या सुपुत्राला मिळाला हा अभिमान आहे.