बेळगावच्या जिल्हाधिकारी पदी एस बी बोमनहळळी यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले असून जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.
2017 आगष्ट महिन्यात जिया उल्ला यांची मंडया हून बेळगावच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली होती. राज्य सरकारच्या या आदेशाने जिया उल्ला यांची कारकीर्द एक वर्षाची ठरली आहे.एस बी बोमनहळळी यांची बेळगावला नियुक्ती करण्यासाठी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी प्रयत्न केले होते अशी माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी एस बी बोमनहळळी यांची बेळगाव जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करून एक प्रकारे पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांचं बंड शमवण्याचा प्रयत्न चालवला आहे. रमेश जारकीहोळी यांच्या ऊस कारखान्याला थकीत बिल देण्यासाठी नोटीस बजावल्याने ही बदली झाले की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.