श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर गौरीचे आगमन असते. अनेक महिला वर्ग गौरीच्या आगमनाची वाट पाहत असतात. 4 दिवसानी आगमन होणाऱ्या गौराईची प्रतिष्ठापना करण्यात येते.
प्रत्येक ग्रामीण भागात कुमारिका परिसरातील घरातून कलशा घेऊन त्यात पाणी भरून पाच खडे , पाच प्रकारच्या झाडांची पाने ते सजवून एका ठिकाणी ठेऊन त्याला हार घालतात. त्याची विधिवत पूजा करण्यात येते. त्यानंतर चुरमुरे काकडी कापून, नारळ वाढविण्यात येतो. त्यानंतर त्या कलशा त्या त्या घरी जाऊन दारात उभे करतात. त्या कुमारिकांच्या पायावर पाणी घालून हळद, कुंकू लावून आरती करतात.
आरती झाल्यानंतर गौराईला घरात नेऊन तिला पुजले जाते. गणरायाच्या तिची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्यानंतर संध्याकाळी पाच प्रकारातील पले भाजीचा गौराईला नैवेद्य दाखवला जातो. ही प्रथा अजूनही कायम आहे. शहाराबरोबर ग्रामीण भागातही ही प्रथा कायम आहे. सध्या मोठ्या उसाहात का कार्यक्रम सुरू आहे.