कंग्राळी खुर्द येथे पाठबंधारे खात्याच्यावतीने फळी घालावीत अशी मागणी करण्यात आली होती. लघुपाटबंधारे खात्याने याकडे लक्ष देण्याची गरज होती. मात्र थातुरमातुर काम करून हात झटकले आहेत. या बंधाऱ्यावर १० फुटापर्यंत फळी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, चेतक कांबळे, ग्राम पंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील, रमेश पाटील, लता पाटील, बाळू पाटील, बसवंत मायाणाचे, गणपत साठे, महादेवी देसुरकर, कविता शिंदे, सचिन शिवणगेकर आदी उपस्थित होते.
गाव सुधारणा समितीचे आर आय पाटील यांनी कंग्राळी येथील बंधाऱ्यावर फळी घालाव्यात अशी मागणी गणेश विसर्जन करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यामुळे खात्याच्या वतीने केवळ दोन ते तीनच फूट फळी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे विसर्जन करणे कठीण होणार आहे. जर येथे १० ते १५ फूट प्रयत्न फळी बसविल्यास गणेश भक्तांना सोईचे होणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
जर येथे फळी बसविल्यास आजूबाजूच्या परिसरातील गावातील गणेश भक्तांनाही याचा फायदा होणार आहे. त्यामुळे येथे फळी लवकरात लवकर बसवावी, अशी मागणी करण्यात आले आहे. याचा गांभीर्याने विचार करण्यात येईल व फळी बसविण्यासाठी संबंधित खात्याला सूचना करण्यात येथील असे सांगण्यात आले.