के एल एस संस्थेने केलेलं शैक्षणिक कार्य अतिशय गौरवास्पद आहे असे उदगार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बेळगावात काढले. के एल एस संस्थेने आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळीं राज्यपाल वजुभाई वाला मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी,सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा,मुख्य अटर्नि जनरल के के वेणूगोपाल, आदी उपस्थित होते.
ही माझी बेळगावला पहिली भेट आहे. राष्ट्रपती झाल्यावर मी पहिल्यांदाच बेळगावला आलो आहे.कर्नाटक लॉ सोसायटीने उच्च शिक्षणाचे महत्व ७५ वर्षांपूर्वी ओळखले. कायद्याचे शिक्षण सुरू केले.उच्च शिक्षण महत्वाचे आहे.आपणही कायदा शिक्षण घेऊनच आपली कारकीर्द सुरू केली. कर्नाटकाचे राज्यपाल वजुभाई वाला हे सुद्धा वकील होऊन नंतर राजकारणात आले.के एल एस ची स्थापना करणारेही वकिलाच होते. याचा अभिमान वाटतो असे ते म्हणाले.
बेळगावला शिक्षण आणि हुषारीचा इतिहास आहे. स्वामी विवेकानंद यांनी या शहराला भेट दिली होती.स्वामीजी यांनी शिकागो येथे भाषण केल्याच्या प्रसंगाला १२५ वर्षाचा इतिहास आहे. असे सांगताना आजच्या माणसाचा सत्य ते सत्य प्रवास सुरू आहे.
नुकतीच आम्ही गणेश चतुर्थी साजरी केली. देशभरात उत्साह देणारा सण आहे.लोकमान्य टिळक यांनी हा उत्सव सुरू केला. होमरुल लीग चळवळीची सुरुवात १९१६ मध्ये बेळगाव मधून सुरू केली हे मला समजले आणि मी भारावून गेलो.बेळगावने परंपरा जपल्या आहेत.
१९३९ ला ही संस्था स्थापन करून सामाजिक हित जपणारे वकील घडवले.संस्थापक हे ज्येष्ठ वकील होते तर या संस्थेला ज्यांचे नाव दिले आहे ते वंटमुरीचे राजा लखमगौडा सरदेसाई यांनी त्या काळात १ लाख रुपये देणगी देऊन मोठे काम केले आहे.कायदा ही सामाजिक गरज आहे.निसर्गाचा कायदा शिस्त शिकवतो
मानव हक्क कायदा हा नागरिकतेची गरज आहे
कायदा गरजेचा आहे तो देश घडवण्यासाठी.वकील आणि न्यायाधीश हे न्याय मिळवून देतात
महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला न्यायाची वाट दाखवली. आज ही संस्था
४० शिक्षणसंस्था चालवते. अंदाजे १४००० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. माजी विद्यार्थी वर्गाची मोठी संघटना आहे. ती ५०००० च्या घरी गेली आहे. या संस्थेने देशालाकायदे पंडित दिले.
२ माजी चीफ जस्टीस दिले. सध्याचे आटर्न जनरल के के वेणूगोपाल हे याच संस्थेचे आहेत
याचा अभिमान वाटतो.
आमचा देश बदलाच्या टप्प्यावर आहे. तरुण लोक जास्त असलेल्या या देशाचा जीडीपी ८.२℅ आहे.आमचा चेहरा तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या विकासावर उभा आहे. तरुणांची प्रेरणा शिक्षणात आहे. ते नव्या आव्हानांना तयार होत आहेत
उच्च शिक्षणाचे महत्व त्यांना समजले आहे. आज केंद्राने ६० मोठ्या विध्यपीठाना अभिमत दर्जा दिला आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हे केले आहे. बेळगाव हे पूर्वीपासून इंडस्ट्रियल हब आहे. येथील फॉड्रीने मोठे योगदान दिले आहे. आज बेळगाव ऐरोस्पेस इंडस्ट्रीत नाव कमावत आहे. या व्यवस्थेचा नॉलेज इको सिस्टिममध्ये बदल घडवून विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे.
कायदा शिक्षण क्षेत्रातही अनेक आव्हाने असून कायदा शिक्षण क्षेत्रात तांत्रिक क्षेत्राशी निगडित बदल शिक्षण देणे अवघड आहे. यावर संशोधन गरजेचे आहे.सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा हे लवकरच सेवानिवृत्त होणार असून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी कायदा क्षेत्रात सल्लागाराची भूमिका निभावावी असे आवाहन केले .