बेळगावचे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मागील पंधरवड्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि जेडीएस काँग्रेस प्रणित युती सरकारला हादरे दिले होते.
आज या हादऱ्यांनी किती परिणाम केले याचे चित्र बेळगावच्या विमानतळावर दिसून आले आहे.
विमानतळावर मुख्यमंत्री उतरताच त्यांचे स्वागत पालकमंत्र्यांनी केले आणि एकाद्या लहान मुलांचे गाल जसे पकडतात तसे स्वामींनी जारकीहोळी यांची समजूत काढली.
कायतरी चुकीचे निर्णय घेऊ नको रे बाबा प्रश्न सरकार टिकण्याचा आहे. असे तर कुमारस्वामी यावेळी म्हणाले नसतील ना?
ते काहीही म्हणोत पण बेळगाव जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींचे वजन सरकारला चिंतेत पाडवू शकते आणि मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्याचे गाल चोळावे लागतात हे दिसले.गाल चोळताना आम्ही तुम्हाला सहजपणे इतर पक्षात जाऊ देणार नाही असे म्हटले की काय अशी देखील चर्चा सुरू होती.