Monday, December 23, 2024

/

असे पत्र प्रत्येक बेळगावकराने राष्ट्रपतींना पाठवावे

 belgaum

प्रति,
मा. महामहिम राष्ट्रपतिजी,
श्री. रामनाथ कोविंदजी,
राष्ट्रपतींचे पीआरओ, म्युजीएम, राष्ट्रपतींचे सचिवालय, राष्ट्रपती भुवन, नवी दिल्ली- ११०००४

अर्जदार: आपले नाव घाला किंव्हा एक सामान्य बेळगाव वासीय असे लिहा.
विषय: राष्ट्रपतिजी आपले आभार मानण्यासाठी पत्र
महोदय
राष्ट्रपतीजी आपण उद्या बेळगावला येत आहात. उद्या कार्यक्रमाच्या गडबडीत आम्ही तुम्हाला भेटू शकणार नाही. आपण येत आहात म्हणून रस्ते सुधारले आहेत म्हणून आपल्याला हे पत्र लिहुन आपले आभार मानावेत ही इच्छा झाली म्हणून हे पत्र लिहीत आहे.
प्रत्येक बेळगावकराच्या वतीने राष्ट्रपतीजी आपले आभार मानायलाच पाहिजेत. कारण इथल्या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही अतिशय वाईट परिस्थितीत जगत होतो.
के एल एस सोसायटीने कार्यक्रम ठेऊन आपल्याला बोलावले हे बेळगाव शहरावर मोठे उपकार झाले आहेत. आपला दौरा नक्की झाला आणि बेळगावचे झोपलेले अधिकारीही जागे झाले. बेळगावचे रस्ते गाड्या चालवण्यायोग्य नाहीत याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती काम हातात घेतले आणि किमान गाड्या जाऊ शकतील असे रस्ते मिळू शकले आहेत. आपण जर येत नाही असे म्हटले असते तर रस्ते तसेच राहिले असते म्हणून आपले आभार मानावे तितके कमी आहेत.

बेळगावचे सांबरा विमानतळ ते उद्यमबाग पर्यंतचे सर्व रस्ते सुरळीत झाले आहेत. सगळे खड्डे भरण्यात आले. रात्रीच्या रात्री दुभाजकांना आंघोळ घालण्यात आली. त्यांची रंगरंगोटीही करण्यात आली. दुभाजकांवर फुले लावलेली झाडेही आली. ही सगळी राष्ट्रपतींची म्हणजे आपली कृपा आहे.
जे काम माध्यमांच्या तिखट बातम्यांनी केले नाही, जे काम आंदोलनांनी केले नाही, जे काम अपघात झाले आणि गाड्या अडकल्या तरी झाले नाही ते काम राष्ट्रपतींनी म्हणजे आपण करून दाखवले आहे. मी आपले मनापासून आभार मानतो.

आपला विश्वासू,
आपले नाव
किंव्हा
सामान्य बेळगावकर
(किंवा हेच पत्र खालील ई-मेल वरही पाठवता येईल
[email protected])

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.