बेळगावची कन्या शीतल कोल्हापुरे हिने आशिया पॅसिफिक स्पर्धेत भाग घेऊन दोन सुवर्णपदके मिळवली आहेत. मलेशिया येथे ही स्पर्धा झाली.
या स्पर्धेत ८०० मिटर धावणे व ४ × १०० रिले मध्ये तिने सुवर्ण घेऊन देशाचे नाव उज्वल केले आहे.
फेसबुक फ्रेंड सर्कल आणि इतर मदत देणाऱ्यांनी तिला १ लाख १५ हजार रुपयांची मदत मिळवून दिली होती.
या मदतीची जाण ठेऊन शीतल हिने आपले प्रयत्न पणाला लावले आणि बेळगावला दोन सुवर्ण पदके आणून दिली आहेत.
अतिशय सामान्य कुटुंबातील शीतलच्या या यशाने बेळगाव शहराला एक मोठा मान मिळाला आहे. यापूर्वीही आपल्या जिद्दीने तिने अनेक पदके मिळविली आहेत.