महामहिम राष्ट्रपती,राज्यपाल,सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश ,मुख्यमंत्री,उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या सह अनेक मंत्री शनिवारी 15 सप्टेंबर रोजी उद्यमबाग येथील जी आय टी कॉलेजच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
बेळगाव शहराला शनिवारी होणाऱ्या व्ही व्ही आय पी व्हिजिट मुळे शहरातील ट्रॅफिक बदल, इतर सूचना पोलिसांनी जाहीर केल्या आहेत.
शनिवारी सकाळी 8:30 ते दुपारी 1:30 पर्यंत काही रोड वर मार्ग बदल, तर काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
15 सप्टेंबर रोजी पहिला रेल्वे गेट दुसरा रेल्वेगेट हा रहदारी साठी पूर्ण बंद करण्यात आला आहे.याला पर्यायी मार्ग म्हणून ओल्ड पी बी रोड आणि कपिलेश्वर रोडचा वापर करावा.
बेळगाव खानापूर रोड NH4A वर शहरात कुठेही गाडी पार्किंग करू नये
विमान तळ सांबरा रोड, एन एच 4 हायवे ,लेक व्यु क्रॉस,अशोक सर्कल ते राणी चनम्मा चौक,कॉलेज रोड,खानापूर रोड काँग्रेस रोड वर पार्किंग करू नये.
विजापूर बागलकोट आणि यरगट्टी कडून येणाऱ्या वाहनांनी मारिहाळ पोलीस स्थानका पासून सुळेभावी मार्गे रस्त्याचा वापर करावा.
सांबरा ब्रिज ,महंतेशनगर ब्रिज अशोक सर्कल कडून येणाऱ्या भाजीच्या गाड्या एन एच 4 ते बी एस येडियुराप्पा मार्ग कडून घ्याव्यात.
गोव्या कडून येणाऱ्या सर्व बस पिरनवाडी जवळ अडवण्यात येतील आणि तिथूनच परत जातील उरलेली वाहने पर्यायी मार्गाने जातील.
हायवे जवळ अशोक नगर चौथ्या क्रॉस जवळील खुल्या जागेत कोल्हापूर धारवाड आणि गोकाक कडून येणाऱ्या गाड्या अडवल्या जातील आणि तेथूनच चालवल्या जातील.
धर्मनाथ सर्कल पासून सिटी बस चालवल्या जातील.
14 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत शहरात अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.
गोवा खानापूर कडून येणारी वाहने देसुर मार्गे एन एच 4 हायवे कडे जातील.