बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वेठिस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 5 हजार रुपये चलन भरून ते परत न देण्याची अट घालण्यातआली होती. मात्र आता ती अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून समाधान व्यक्त होत आहे
बेंगलुरू येथील गणेशोत्सव मंडळांना अशी अट घालण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेळगावात ही अट लादण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र बेळगाव येथील सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने येथील अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही अट शिथिल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
अग्निशामक दलाच्या परवानगीसाठी 5 हजार रुपये चलन म्हणून ठेवावे लागणार होते. या संबंधी राज्य सरकारने नवीन अध्यादेश काढला आहे.बंगळूर येथे सध्या अग्निशामक दलाने या प्रकारे दंडक घातला आहे. सर्व गणेश मंडळा कडून पाच हजार रुपयांचे नॉन रिफंडेबल डिपॉजिट घेतलं जात आहे तोच फंडा आता बेळगावताही वापरण्यात येणार होता. मात्र महामंडळाने याला विरोध करून ही अट शिथिल केल्याचे सांगितले आहे.
यावर्षी अग्निशामक दलाची परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी परवानगीचा 5 हजार रुपयांचे चलन भरावे लागणार आहे. हे चलन भरल्यानंतर ते मंडळांना परत देण्यात येणार नाहीत, अशी माहिती देण्यात आली होती. यासाठी अग्निशामक दलातील काही अधिकारी ही बेंगलोरला जाऊन आले. मात्र बेळगावात याप्रकारे कोणतेच अद्द्यादेश चालणार असल्याचे महामंडळाने सांगितल्याने हा आदेश शिथिल करण्यात आला आहे.
अचानक काढलेल्या या दंडकामुळे अनेक गणेशोत्सव मंडळातून संताप व्यक्त करण्यात येत होता. मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी विकास कलघटगी सागर पाटील आदींनी अग्निशामक दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून याबाबत सविस्तर चर्चा केली. बेळगावात असा दंडक घालणे म्हणजे चुकीचे आहे. आणि कर्नाटक सरकारचा हा निर्णय अनेक मंडळाची डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे. त्यामुळे असे दंडक घालू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. याचा विचार करून अग्निशामक दालने ही अट शिथिल करण्यात आली आहे.