बेळगावातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपत गल्ली मारुती गल्ली आदी ठिकाणी गणेशोत्सव तोंडावर हेस्कॉमने खंडित वीज पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे मागील दोन दिवसापासून दुरुस्तीच्या नावाखाली हेस्कॉमने व्यापाऱ्यांची गैरसोय केली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सारे शहर व ग्रामीण भागातील नागरिक बेळगावात येत असतात. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून लोक येत असतात. गणेशाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली असून जोरदार खरेदी सुरू आहे. मात्र हेस्कॉमने दुरुस्तीच्या नावाखाली व्यापाऱ्यांची गैरसोय करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सोमवार मंगळवार आणि आज बुधवार असे तीन दिवस सारखं बिजली गुल होत आहे त्यामुळं लहान व्यापारी त्रासात आहेत.
सणासुधीच्या काळातच हेस्कॉमला दुरुस्तीची दुर्बुधी का सुचते? असा सवाल करण्यात येत आहे. जर दुरुस्ती करायची असेल तर महिना आधी का करण्यात येत नाही? मागील दोन दिवसांपासून वीज पुरवठा काढण्यात आल्याने अनेक व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई हेस्कॉम देणार आहे का? असा संतप्त प्रश्न निर्माण झाला आहे.
गणपती गुरुवारी आला असला तरी हेस्कॉमने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे नुकसान तर झालेच. मात्र लाखो रुपये खर्च करून आणलेले साहित्यही वाया गेले आहे. त्यामुळे बुधुवारी तरी वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात येत आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असा इशाराही देण्यात आला आहे.