कपिलेश्वर उड्डाण पुलाचे काम सुरू असतेवेळी देखील गणेश सेवा संघाने मध्यवर्ती गणेश मंडळाच्या खांद्याला खांदा लावून विसर्जन मिरवणूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला आहे त्याच धर्तीवर या वर्षी देखील गणेश विसर्जन यशस्वी करण्याचे प्रयत्न करा असे आवाहन गणेश सेवा संघाच्या बैठकीत मांडण्यात आले आहेत.
मंगळवारी दि११ रोजी श्री गणेश सेवा संघाची महत्वपूर्ण बैठकभाजप नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली छत्रे वाडा येथे पार पडली यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
गणेश उत्सवात शहरामध्ये विविध ठिकाणी लोकजागृती करत कार्यक्रम होणार असून यावेळी महत्वपूर्ण किरण जाधव यांच्या नावे शहरातील रुग्णांसाठी रुग्णवाहिनी ऍम्बुलन्स सेवा चालू करण्यात येणार आहे सदर सेवा २४ तास 12 महिने सेवा भेटणार असून याचे उदघाटन महापौर बसाप्पा चिकलदिनी यांच्या हस्ते होणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये होणाऱ्या समस्या पोलीस प्रशासन व नगर पालिका अधिकारींना सूचना देखील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दर वर्षी प्रमाणे विमल फौंडेशन तर्फे अथर्वर्शीष पठण दि १६ रोजी कार्यक्रम मारुती मंदिर मारुती गल्ली येथे होणार असून कार्यक्रमात सर्वानी सहभाग घ्यावा असे आ किरण जाधव यांनी केले.बैठकीमध्ये श्रीनिवास बिसनकोप , संतोष पेडणेकर गजू नंदगडकर , प्रज्ञा शिंदे सारिका केकरे , स्नेहल कोले , रेखा मुचंडी , व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.