पुणे मुंबईच्या धर्तीवर बेळगाव शहरात देखील चतुर्थीच्या अगोदरच सार्वजनिक गणेश मंडळांचा आगमन सोहळे रंगताना दिसत आहेत.
सोमवारी भांदुर गल्ली येथील गणेश मंडळाचा आगमन सोहळा जल्लोषी झाल्यावर आज मंगळवारी सायंकाळी शहरातील अनेक मंडळांनी आगमन सोहळा आयोजित केला होता.
शहरात धर्मवीर संभाजी चौक गणेशमय वातवरण बनलं होत.कपिलेश्वर रोड गणेश मंडळ, गोंधळी गल्ली गणेश मंडळ आणि शनिवार खुट गणेश मंडळाचे तर अनगोळ भागातील अनेक गणपतीचं आगमन झालं आहे.
बुधवारी कपिलेश्वर रोड गणेश मंडळाच्या वतीनं आमदार अनिल बेनके,समाज सेवक कपिल भोसले आणि हाथवे संचालक आणि उद्योजक संजय कडोलकर आदींनी गणपती पूजन केले.प्रत्येक गणपती समोर ढोल ताशा पथकाचे आकर्षण होते.
चतुर्थी रोजी आगमन मिरवणुकीस उशीर होत असल्याने वेळेत गणपती पूजन होत नाही त्यामुळे अनेक मंडळांनी अगोदरच आगमन सोहळा सुरू करण्यास सुरुवात केली आहे.