हिंडलगा गणेश मंदिर शेजारील अरगन तलावात अनेक वर्षे साचून राहिलेला गाळ मराठा रेजिमेंट ने स्वच्छ केला आहे. तलावाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. आता निर्माल्य टाकणे आणि गणपती मूर्ती विसर्जन करण्याचे टाळून नागरिकांनी या तलावांचे सौन्दर्य टिकवून ठेवण्याची गरज आहे.
मराठा रेजिमेंट चे जवान आणि काही माजी सैनिकांनी मिळून हा गाळ काढून मोठी कामगिरी केली आहे. आता अरगन तलावची स्थिती सुंदर झाली आहे. मराठा चे ब्रिगेडियर गोविंद कालवड यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.
आता नागरिकांनी पुढे येऊन या तलाव परिसरात बाक, बसण्याचे साहित्य व इतर मदत करण्याची गरज आहे. अशी मदत झाल्यास तलावाचे सौन्दर्य वाढून फिरायला जाणारी मुले व व्यक्तींनाच त्याचा लाभ होऊ शकेल, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, किमान हा तलाव पुन्हा गाळाने भरू नव्हे यासाठी योगदान देणे गरजेचे आहे.