इंधन दरवाढ हा ज्वलंत विषय असून त्याविरुद्ध बंद पुकारण्यात आला असतानाही गणेश चतुर्थी पुढे असल्यामुळे बाजारपेठ सुरू आहे. बेळगाव मध्ये बंद यशस्वी होऊ शकला नाही. बंदचा फज्जा उडला आहे.
आज सकाळी बेळगाव मध्ये बंदचे वातावरण होते पण दुपारी १२ नंतर बाजारपेठेत गर्दी सुरू झाली आहे. यामुळे बंद असला तरी बाजारपेठ सुरू आहे. गणपती पुढे असल्याने काय करता येत नाही, खरेदी करावीच लागेल असे नागरिक आणि व्यापारी यांनी सांगितले आहे.
काँग्रेस व विरोधी पक्षांनी पुकारलेले बंद चे आंदोलन ही जनतेचीच भावना आहे पण सर्व व्यवहार सुरू करणे अटळ ठरले आहे.
बेळगाव शहरात समिती ने पुकारलेले बंद यशस्वी होतात. सायंकाळनंतर काही प्रमाणात व्यवहार सुरू होतात. पण राष्ट्रीय पक्षांनी बंदची हाक दिली की बेळगावचे नागरिक योग्य साथ देत नाहीत..