बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमधील वाद आणि त्यातून कर्नाटक सरकारवर आलेले संकट याला अजून पूर्णविराम मिळालेला नाही. जारकीहोळी ब्रदर्स ची चढाई आता भाजपकडे होत आहे. बी एस श्रीरामलू आणि एडीयुराप्पा यांच्याशी संपर्क साधून आपले समर्थक आमदार घेऊन भाजपमध्ये समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
२० ते २५ काँग्रेस आमदारांचा संच थेट भाजप पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आमदार पदाचा राजीनामा देऊन पुढील पोटनिवडणूक लढवण्याची तयारी असून यासाठी आर्थिक व्यवहार केले जातील. जेडीएस काँग्रेस प्रणित कर्नाटक सरकारला याचा धोका जास्त आहे.
सरकार स्थापन करतेवेळी ऑपरेशन कमळ करायचे नियोजन होते. पण तसे झाले नाही पण स्वतः काँग्रेसचे आमदार येत असतील तर भाजप त्यांना स्विकारण्याच्या तयारीत आहे.
पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे स्वतः आज भाजप नेत्यांची भेट घेण्यास बंगळूर येथे गेले आहेत. सर्व चर्चा योग्यरितीने झाल्या तर आज संध्याकाळ पर्यंत कर्नाटक सरकारच्या सिंहासनाला हादरा बसणार आहे. याकडे सरकारचे आणि विरोधकांचेही लक्ष आहे.