belgaum

‘चाकू हल्ला प्रकरणी उर्दू नगरसेवकास अटक’

0
442
 belgaum

माजी नगरसेवक फिरदोस दर्गा यांच्यावर चाकूने हल्ला केल्या प्रकरणी नगरसेवक मतीन शेख आणि त्यांच्या दोघा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.गेल्या 3 सप्टेंबर रोजी उज्वल नगर भागात उर्दू नगरसेवकांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत फिरदोस दरगाह जखमी झाले होते.

उज्वलनगर मध्ये झालेल्या मारामारीत मतीन शेख देखील किरकोळ जखमी झाले होते त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते.

Matin shekh

 belgaum

माळ मारुती पोलीस निरीक्षक चननकेशव टेंगरीकर यांनी कारवाई करत मतीन शेख यांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.गेल्या दोन वर्षापूर्वी देखील फिरदोस आणि मतीन यांच्यात माजी मंत्री सी एम इब्राहिम यांच्या समक्षच सर्किट हाऊस मध्ये राडा झाला होता त्यावेळी पासूनच उभयतांत वैमनस्य निर्माण झाले होते त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी माळी मंच येथील एका विवाहा दरम्यान वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले होते.

मुस्लिम समाजातील मौलाना साजिद यांच्या सह अनेक पंचांनी देखील दोन गटात दिल जमाई साठी प्रयत्न केले होते मात्र सुलह झाली नव्हती शेवटी मतीन यांना अटक झाली आहे.या प्रकरणी माळ मारुती पोलीस अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.