पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाही मेजवानीत सहभागी होण्याची संधी बेळगावच्या मलप्रभा जाधव हिला मिळाली आणि तिने बेळगावची मान उंचावली आहे. पंतप्रधानांच्या सोबत व्यासपीठावर बसून मलप्रभाने आपले महत्व किती आहे हेच दाखवून दिले आहे.
मलप्रभाने कुराश या खेळात पदक मिळवून देशाचे महत्व वाढवले आहे. तिच्यामुळेच देशाला एक पदक मिळाले. आशा सर्व पदक मिळवलेल्या व्यक्तींना पंतप्रधानांनी मेजवानीसाठी बोलावले होते. केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड यांच्या उपस्थितित ही मेजवानी झाली.
मलप्रभा सोबत कुराश मध्ये रौप्य पदक मिळवलेली दिल्लीची पिंकी बलहाराला देखील पंतप्रधान सोबत स्थान दिले होते.
दिल्ली येथे मलप्रभाला प्रेरणाच मिळाली आहे. आता ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरू करून तिथे देशासाठी पदक आणण्याचे आपले स्वप्न आहे असे मलप्रभाने बेळगाव live ला सांगितले आहे.
आपल्याला आर्थिक मदत दिलेल्या तसेच आशीर्वाद दिलेल्या सर्वांचे आपण आभार मानतो असे तिने सांगितले.