यंदा गणेश चतुर्थी गुरुवार दि १३ रोजी आली आहे. गणपतीची तयारी जोरदार सुरू आहे. चतुर्थीला मूर्ती आणून पूजन करण्यास दरवर्षी उशीर होऊ लागल्याने आता आदल्या दिवशीच त्रयोदशीला मूर्ती आणली जाते. असे करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची संख्याही वाढत चालली आहे.
वाजत गाजत आगमन, त्यानंतर पूजन आणि मग आरती हे सगळे करिपर्यंत चतुर्थीला होणारा उशीर पाहता सर्व विधिवत होत नाही. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा वेळ निघून जातो म्हणून हा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे.
गोंधळी गल्ली, जालगार गल्ली, काकतीवेस, जुने बेळगाव क्रॉस, खासबाग यासारख्या मंडळांनी आदी एकदिवस मूर्ती आणण्याची तयारी केली आहे अशी माहिती मिळाली.
सर्व मंडळांचे कार्यकर्ते आपापल्या घरी गणपती बसवून मग सार्वजनिक मूर्ती प्रतिष्ठा करण्यास येतात, त्यामुळे वेळ अपुरा पडतो यासाठी आदल्याच दिवशी मूर्ती आणून ठेवल्या जात आहेत.
मागील एक दोन वर्षांपासून ही पद्धत पडत आहे. तसेच त्यामुळे चतुर्थीला रस्त्यावरून होणाऱ्या गर्दीवरही आळा बसू शकणार आहे.