बेळगावात गणेश उत्सवा निमित्य होत असलेला गैर प्रकारांना आळा देऊन शिस्त शांत आणि संयमाने हा उत्सव जल्लोषी साजरा करण्याच्या हेतुनी शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी शहापूर गणेश मंडळा साठी यावर्षी एक अभिनव उपक्रम चालू केला आहे.
शहापूर पोलीस स्थानकात झालेल्या शांतता समिती बैठकीत त्यांनी या नवीन उपक्रमांची माहिती दिली आहे.शहापूर पोलिस स्थानकातील आपल्या हद्दीतील एकूण शहापूर भागातील 78 सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांसाठी त्यांनी हा उपक्रम राबवला आहे.
शिस्त,शांतेत,उत्साहात,नियमांचे तंतोतंत पालन करत श्री गणेश उत्सव साजरा केलेल्या मंडळाला रोख दहा हजार तसेच पोलीस ठाण्याचा चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.मात्र हे बक्षीस एकाच मंडळास मिळणार आहे.याच परिक्षण नेमलेली समिती करून निर्णय घेण्यात येणार असे जाहिर केले आहे.त्यासाठी हा उपक्रम वाखाणण्याजोगा ठरला आहे.
गणेश उत्सवात डॉल्बी न लावणाऱ्या, दारू सिगारेट सेवन न करता उत्सवात सहभागी होणाऱ्या, मंडपात 11 दिवस कायमस्वरूपी दोन कार्यकर्ते ठेवणे,गल्लीतील जेष्ठ अशी पाच जण पंच मध्यरात्री पर्यंत मिरवणुकीत सहभाग घेणे,कायदा आणि सुव्यवस्थेस मदत करणारे एक मंडळाची निकड करणार असल्याचे जावेद मुशाफिरी यांनी बेळगाव live ला सांगितले आहे.मंडळाची संख्या वाढल्यास त्यातून एकाची निवड होणार आहे.