राहुल शरणाप्पा दिवटगी (वय २७) रा अन्नपूर्णेश्वरी नगर येळ्ळूर रोड या युवकाचा फक्त अपहरणच नव्हे तर सुपारी देऊन खून झाल्याचे उघड झाले आहे.
राहुलचा खून करून त्याचा मृतदेह तिलारी घाटात टाकण्यात आल्याचे वृत्त पोलिसांच्या हाती लागल्याने सकाळीच टिळकवाडी पोलिसांचे पथक थेट तिलारी घाटाकडे रवाना झाले आहे. मृतदेह हातात घेऊन पुढील तपास केला जाणार आहे.
राहुल हा तरुण १० ऑगस्ट पासून बेपत्ता आहे. त्याचे नातेवाईक दररोज पोलीस स्थानकाला जाऊन पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी करत आहेत परंतु शोध घेण्याकडे टाळाटाळ केली जात होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करू असा इशारा दिल्यानंतर काल रात्री पासून २४ ते २५ दिवसानंतर तपासाची गती वाढवण्यात आली आहे.
त्याच्या कुटुंबाने राम चोटीवाले नामक व्यक्तीवर थेट आरोप करून घातपात झाल्याचा आरोप केला होता. आता या आरोपाला दुजोरा मिळत आहे. मृतदेह तिलारी घाटात टाकण्यात आला आहे.
या प्रकरणात टिळकवाडी पोलिसांचे कामकाज संशयास्पद आहे त्यामुळे दुसऱ्या पोलीस निरीक्षकांना तपास अधिकारी म्हणून नेमण्यात यावे आणि तपासात हेळसांड केलेल्यावर कारवाई करावी अशी मागणीही होत आहे.