ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हर ब्रिज पूर्ण होण्यास सरकारी डेडलाईन एप्रिल २०१९ पर्यंत आहे.
हे ११० वर्षीय ब्रिज गोगटे सर्कल ते गोवावेस ही दोन केंद्रे जोडण्याचे काम करते. मागच्या वर्षी २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात या ब्रिज च्या कामाची सुरुवात झाली.
१४ ऑक्टोबर २०१७ पासून हे ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. १९०१ मध्ये ब्रिटिश सरकारने हे ब्रिज बांधण्याची सुरुवात केले होते, आणी १९०५ मध्ये ते बांधून पूर्ण झाले होते. २००५ मध्ये इंग्लंड मध्ये कार्यरत त्या कंपनीने बेळगाव मनपाला पत्र लिहून हे ब्रिज आता जुने झाले आहे, पाडवून परत बांधा अशी सूचना केली होती.
२०१५ मध्ये सूचना होऊनही २०१७ मध्ये कामाला सुरुवात झाली. कॉन्ट्रॅक्टर ला काम पूर्ण करण्यास १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. म्हणजेच एप्रिल २०१९ पर्यंत काम पूर्ण होण्याची गरज आहे.
पावसामुळे हे काम थांबले आहे. आता लवकरच हे काम सुरू होऊन ते लवकर पूर्ण होण्याची गरज असून त्यासाठी आता लक्ष देण्याची गरज आहे.