कर्नाटक लॉ सोसायटी आणि आर.एल.लॉ कॉलेजच्या दि.१५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ,सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा,कर्नाटकचे राज्यपाल,मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत के एल एस संस्थेचे अध्यक्ष अनंत मंडगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष एम.आर.कुलकर्णी आणि खासदार सुरेश अंगडी उपस्थित होते.अमृत महोत्सव कार्यक्रम गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे होणार असून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती इ. एस.वेंकटरामय्या ,राजेंद्रबाबू तसेच एटर्नि जनरल के.के.वेणूगोपाल यांच्यासह अनेक दिग्गजांनी आर एल लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
अमृत महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून इमारतीचे आणि विविध कक्षांचे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे.संस्थेच्या संस्थापक सदस्यांच्या नावाने प्रत्येक महिन्याला व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अनंत मंडगी यांनी दिली.पत्रकार परिषदेला आर.एस.मुतालिक देसाई,उदय कालकुंद्रीकर,राजेंद्र बेळगावकर यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.