उत्तर कर्नाटकातील ऐतिहासिक जुने आणि सर्वात लांब धावपट्टीचे विमान तळ लाभलं असताना स्पाईस जेट कंपनीच्या सर्व फ्लाईट फुल्ल जात असताना देखील बेळगावची सर्व विमाने हुबळीला का स्थलांतर करण्यात आली या बद्दल संसदेत अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आलाय.
बेळगावातील भाजपच्या दोन खासदारांनी हा प्रश्न विचारला नसून तो बेळगाव बाहेरील खासदारां कडून विचारण्यात आला आहे.काँग्रेसचे राज्य सभा सदस्य बी के हरिप्रसाद यांनी बेळगाव बाबत तळमळ दाखवून राज्यसभेत हा प्रश्न उपस्थित केला आहे.केंद्रीय विमान उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना उड्डाण योजनेतून साठी एक शहराचं खच्चीकरण का केलात असा प्रश्न विचारला आहे.
हरी प्रसाद यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुरेश प्रभू यांनी म्हणाले की बेळगाव बद्दल आम्हाला कल्पना असून एअर इंडिया ने काही विमाने बेळगावातुन सुरू केली आहेत बेळगाव च्या वाट्याचा हक्क हुबळीला देणार नाही.वास्तविक पाहता लोकसभा सदस्य सुरेश अंगडी आणि राज्य सभा सदस्य प्रभाकर कोरे हे दोघेही भाजपचे खासदार आहेत त्यातच कोरे हे उड्डाण योजनेच्या कमिटीत आहेत तर अंगडी यांनी प्रभूंची भेट घेऊन त्यांना स्पाईस जेटच्या फ्लाईट बद्दल कल्पना दिली होती.
बी के हरिप्रसाद हे राज्यसभेचे काँग्रेस खासदार असून ते मूळचे बंगळुरू चे असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत असं असताना त्यांनी बेळगावचा प्रश्न संसदेत मांडला आणि बेळगाव बद्दल तळमळ दाखवली आहे.एकूणच बेळगावचे सध्या असलेले खासदार द्वयी अनेक विषयात दिल्ली दरबारी बेळगावचा आवाज बुलंद करण्यात कमी पडतात हा इतिहास आहे अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.