हायवे शेजारील सर्व्हीस रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगांची दखल अखेर प्रशासनाने घेतली आहे.मंगळवारी बेळगाव live ने ‘सर्व्हीस रोड बनलाय नवीन कचरा डेपो’ (https://belgaumlive.com/2018/07/14031/)या मथळ्याखाली न्यूज प्रसिद्ध केली होती.बातमी प्रसिद्ध करताच केवळ 24 तासाच्या आत बातमीची दखल घेण्यात आली आहे.
गुरुवारी उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके यांनी या कचऱ्याच्या ढिगांची पहाणी करून कचरा काढून स्वच्छ करण्याचे आदेश दिले.अलारवाड क्रॉस कडून बेळगाव शहराकडे येणाऱ्या हायवे शेजारील नाल्याच्या बाजूला सर्व्हिस रोड वर कचरा टाकण्यात आला होता हा कचरा इतका मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला होता ज्यामुळं शेतकऱ्यांना रस्ता बंद झाला होता. पावसामुळे कचऱ्यात घाण निर्माण होऊन याचा त्रास शेतकऱ्यांना होत होता.
सर्वात पहिला ही बातमी बेळगाव liveने उचलून धरली होती.शहर परिसरातील भाजी मार्केट,केळी वखार किंवा हॉटेल मधला कचरा रातोरात टाकण्यात येत होता त्यामुळे याचा त्रास येथून ये जा करणाऱ्यांना होत होता.आमदार बेनके यांनी पालिकेचे अधिकारी उदय कुमार तलवार यांना सदर कचरा स्वछ करून शहरातील हॉटेल मध्ये बसवण्यात आलेले सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करा कोणत्या भागातून हा कचरा येथे टाकण्यात आलाय.माळ मारुती पोलिसांना कचऱ्याचे फुटेज द्या आणि संबंधिता वर कारवाई करा अश्या देखील सूचना केल्या आहेत.पालिकेचे अर्जुन देमट्टी,माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या सह शेतकरी देखील पाहणी वेळी उपस्थित होते.
मंगळवारी बेळगाव live प्रसिद्ध केलेली बातमी वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा:केवळ तुरमुरीतच नव्हे तर हायवे शेजारी देखील सर्व्हिस रोड बनतोय कचरा डेपो – वाचा बेळगाव live