आमदार खासदार पदे मिळाली की अनेक जण रुबाब मिरवताना दिसतात त्याबद्दलचे त्यांचे अनेक किस्से ऐकायला पहायला मिळतात मात्र या सगळ्याला फाटा देत खानापूरच्या विद्यमान आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी आपला साधेपणा दाखवून दिलाय तोही रांगेत उभे राहून मतदान करून….
शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यातील नगर पंचायत आणि नगर पालिकांसाठी जवळपास ७० टक्के मतदान झालंय.खानापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये आमदार अंजलीताई यांनी मतदानाचा हक्क बजावला सर्वासोबत रांगेत उभं राहून वास्तविक पाहता त्यांना आमदार म्हणून मतदानासाठी नंबर न लावता म्हणून थेट प्रवेश मिळाला असता मात्र त्यांनी साधे पणाने रांगेत उभे राहून समाजात लोकशाहीत सर्वजण समान आहेत हेच दाखवून दिले आहे.
खानापूर नगर पंचायतीतील प्रभाग ९ मधल्या सर्व उमेदवाराना एकत्रित आणून वेगळं राजकारण करून दाखवलं आहे.बडे जीवी आणि रुबाब मारणाऱ्या आमदारा पेक्षा हा साधे पणा लोकांना आवडू लागला आहे.
आमदार म्हणजे कुठेही लाईन मध्ये नंबर न लावता थेट प्रवेश मिळू शकतो मात्र अंजलीताईनी लोकशाहीत सर्वजण समान असतात हेच दाखवून दिलंय.