भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या दि 15 सप्टेंबर रोजी बेळगावात येणार आहेत. त्यांच्या येण्याने मात्र बेळगाव परिसरातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहेत. त्यामुळे राष्ट्रपती येती घरा तोचि दिवाळी दसरा अशी गत झाली आहे.
त्यामुळे राष्ट्रपती किंवा व्ही व्ही आय पी मूव्हमेंट बेळगावला झाली तरच विकास कामे होणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एका खाजगी संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होणार असून याबाबत जिल्हाधिकारी झिया उल्ला एस यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत सुचना केल्या आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी पूर्ण काळजी घ्यावी अशी माहितीही देण्यात आली आहे.
राष्ट्रपती हे कर्नाटक लॉ सोसायटीच्या हिरक महोसावी कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्याच्या समवेत सुप्रीम कोर्टाचे न्यायालयाचे न्यायाधीश, कर्नाटक उच्च न्यायालयाचे वकील, अनेक मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. दि 15 सप्टेंबर रोजी गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स च्या मैदानावर दुपारी 3 ते 5 यावेळेस त्यांचा कार्यक्रम होणार आहे सुमारे 4 ते 5 हजार लोक यात सहभागी होतील असा अंदाज आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याबाबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दौऱ्या बाबत आवश्यक सूचना केल्या आहेत.
दरम्यान जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी महा पालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांना रस्ते विमान तळ ते कार्यक्रम स्थळाच्या मार्गावरील रस्ते दुरुस्त करा अश्या सूचना दिल्या आहेत या दौऱ्या निमित्य त्यांनी अधिकाऱ्यांना विविध कामे सोपविली आहेत. पोलीस खात्याला योग्य बंदोबस्त करण्याच्या सूचना देऊन प्रोटोकॉल अधिकारी नियुक्त केले आहेत.
राष्ट्रपती बेळगावला येत असल्याने बेळगावातील विविध कामाना चालना मिळणार अशी परस्थिती निर्माण झाली आहे. मात्र याआधी हीच बुद्धी प्रशासनाला मिळाली असती तर काही जणांचे जीव वाचले असते, यात शंका नाही. यापुढेतरी कोणत्या ना नेत्याची अथवा राष्ट्रपतींची वाट पाहू नये अशा प्रतिक्रिया व्यक्त होतआहेत.