Wednesday, January 8, 2025

/

भरत कुरणेचा एस आय टी कडून मानसिक छळ- पत्नी आईचा आरोप

 belgaum

बेळगावात गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना ट्रेनिंग साठी मदत केल्याच्या आरोपावरून एस आय टी च्या अटकेत असलेल्या भरत कुरणे यास आपल्या कुटुंबाला एसआयटी पथकाकडून नाहक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आज भरत कुरणेची आई रेखा कुरणे व पत्नी गायत्री कुरणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

बेळगावातील कन्नड साहित्य भवन येथे हिंदू जनजागरण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कुरणे याचे वकील चेतन मणेरीकर, मारुती सुतार सुधीर हेरेकर आदी उपस्थित होते

Bharat kurane

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पतीला बंगळूरच्या एसआयटी पथकाने चौकशीसाठी नेत असल्याचे सांगत बंगळूरला नेले. तेथे नेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर सातत्याने बेळगावात त्यांना आणून त्यांच्यासह आपल्या कुटुंबियांनाही मानसिक त्रास दिला असा आरोप भरत याची पत्नी गायत्री कुरणे यांनी केला आपले पती सतत आजारी असतात. सध्या देखील त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यातच त्यांना पोलिसांकडून मानसिक त्रास सुरू असल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली असल्याचे त्यांनी फोनवरून आपल्याला सांगितले. पोलिसांकडून होत असलेल्या छळामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. तपासाच्या नावाखाली पथकाकडून विनाकारण छळ सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या. आमच्या रिसॉर्ट मध्ये ट्रेनिंग झालेले नाही पोलीस चुकीचं सांगत आहेत असेही त्यानी नमूद केलं.

आपला मुलगा भरतला पोलिसांनी अटक केलेच परंतु तपासाच्या नावाखाली आपल्या दुसऱ्या मुलालाही चार-पाच वेळा नेऊन त्याचाही मानसिक छळ चालविला आहे अस त्याची आई रेखा कुरणे यांनी म्हटलंय. भारतच्या अडचणी ऐकण्यासाठीही बंगळूरमध्ये एसआयटी पथकाचे अधिकारी पाच मिनिटांचा खासगी वेळ देत नाही. हे कोणत्या कायद्यात बसते असा सवाल वकील चेतन मणेरीकर यांनी केला आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.